सर्व प्रथम आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! शेअर मार्केट मराठीच्या अधिकृत वेबसाइट वर लिहीत असलेल्या ह्या माझ्या पहिल्या विश्लेषणाचा मला अतिशय आनंद होत आहे आणि ह्या पावन दिनाचे औचित्य साधून आपली वेबसाइट देखील आज पासून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होत आहे आणि ही वेबसाइट आपल्या सर्वांच्या पसंतील जरूर उतरेल ह्या बाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आपण देखील ह्या वेबसाइट ला भरभरून प्रेम आणि सपोर्ट कराल ह्याची मला नक्कीच खात्री आहे.
A)पार्श्वभूमी :-
1) शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात अतिशय चांगली अशी तेजी बघायला मिळाली. निफ्टी ने तर नवीन लाइफ टाइम हाय नोंदवला. बँक निफ्टी देखील मागील पाच महिन्यातील सर्वाधिक क्लोजिंग नोंदवले.
2) शुक्रवारी अमेरिकन आणि यूरोपियन बाजारात थोडी फार तेजी बघायला मिळाली तर भारत सोडून इतर सर्व आशियाई मार्केट मध्ये थोडी फार मंदी बघायला मिळाली.
3) ह्या वीक एंड ला अनेक कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले. त्यापैकी हीरो मोटो कॉर्प, PFC, आयशर मोटर्स, टाटा स्टील यांनी अतिशय चांगले निकाल नोंदवले तर वोडाफोन आयडिया, BPCL आणि झोमॅटो यांनी खराब निकाल नोंदवले.
4) शुक्रवारी वेगवेगळ्या इंडेक्स मध्ये संमिश्र हालचाल बघायला मिळाली. आयटी, FMCG आणि Consumer Durable ह्या इंडेक्स मध्ये चांगली तेजी झाली तर मीडिया, रीयालिटी आणि हेल्थकेअर ह्या क्षेत्रात मंदी झाली.
5) निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये तेजी झाल्याने मार्केट मधील व्होलॅटॅलिटी मध्ये वाढ झाली असून हे दाखवणारा इंडिया विक्स हा इंडेक्स आज जवळपास 5% वधारला आहे.
B)ट्रेडिंग साठी महत्वाच्या लेव्हल :-
1) निफ्टी साठी आता 16700 ते 16800 हे टार्गेट असून येत्या काही दिवसात ते येण्याची शक्यता आता वाढली आहे. 16550 ते 16600 हा रेजिस्टन्स झोन असून 16400 ते 16450 हा सपोर्ट झोन आहे. सोमवारी ओपनिंग कशी होते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
2) बँक निफ्टी साठी 35900 ते 36000 हा सपोर्ट झोन असून 36250 ते 36350 हा रेजिस्टन्स झोन आहे. सोमवारी वरच्या दिशेने ब्रेक आउट येईल आणि किमान 200 ते 300 पॉइंट ची तेजी होऊ शकते असा अंदाज आहे.
C) तेजी मधील काही शेअर:-
टाटा Consumer, TCS, कमिन्स इंडिया, LT
D)मंदी मधील काही शेअर:-
ऑरो फार्मा, REC लिमिटेड, आयशर मोटर्स आणि महिंद्रा आणि महिंद्रा फायनॅन्स
धन्यवाद, खुप स्तुत्य उपक्रम. छान विश्लेषण.
खूप छान माहिती दिली आहे..
धन्यवाद..
Sir,
मी आजच option trading + technical analysis या बुकची अमेझॉन वर ऑर्डर बुक केलेली आहे…
असेच आम्हाला मार्गदर्शन करत रहा.
धन्यवाद..🙏🙏
👌👌👌विश्लेषण आहे सर