A)पार्श्वभूमी :-
1) आज मार्केट मध्ये मिक्स मूड बघायला मिळाला. निफ्टी ने तेजी दाखवत सलग तिसऱ्या दिवशी नवीन लाइफ टाइम हाय ची नोंद केली तर बँक निफ्टी ने मंदी मध्ये क्लोजिंग दिले आहे.
2) आज संपूर्ण जागतिक मार्केट मध्ये मंदीचे वातावरण बघायला मिळाले.
3) आज लिस्ट झालेल्या तीन आयपीओ पैकी देवयानी इंटरनॅशनल ने अपेक्षेप्रमाणे चांगली लिस्टिंग गेन दिली. मात्र लिस्टिंग नंतर प्रॉफिट बूकिंग आले. इतर दोन्ही मध्ये थोडी थोडी लिस्टिंग गेन मिळाली मात्र लिस्टिंग नंतर दोन्ही बाजूने मुव्हमेंट झाली.
4) भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरंसी शी संबंधित कायदा लवकरच संसदेत सादर केला जाईल अशी माहिती दिली.
5) आज देखील शुक्रवार प्रमाणे संमिश्र वातावरण बघायला मिळाले. मेटल, ऑइल आणि गॅस इंडेक्स मध्ये तेजी बघायला मिळाली तर मीडिया, सरकारी बँका आणि ऑटो इंडेक्स मध्ये मंदी बघायला मिळाली.
B)ट्रेडिंग साठी महत्वाच्या लेव्हल :-
1) निफ्टी साठी आता 16600 ते 16650 हा रेजिस्टन्स झोन असून 16450 ते 16500 हा सपोर्ट झोन आहे.
2) बँक निफ्टी साठी 35900 ते 36000 हा सपोर्ट झोन असून 36250 ते 36350 हा रेजिस्टन्स झोन आहे.
3) उद्या निफ्टी बँक निफ्टी ला घेऊन तेजी करणार की बँक निफ्टी निफ्टी ला घेऊन मंदी करणार ही बघणे महत्वाचे राहील.
C) तेजी मधील काही शेअर:-
अपोलो हॉस्पिटल, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि REC लिमिटेड
D)मंदी मधील काही शेअर:-
कॅडीला हेल्थकेअर, ऑरो फार्मा, TVS मोटर्स, मारुती आणि सन टीव्ही