A)पार्श्वभूमी :-
1) आज देखील कालच्या प्रमाणेच मार्केट मध्ये मिक्स मूड बघायला मिळाला. सुरवातीला बँक निफ्टी ने निफ्टी ला खाली खेचण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारच्या सत्रात निफ्टी ने तेजी दाखवत सलग चौथ्या दिवशी नवीन लाइफ टाइम हाय ची नोंद केली तर बँक निफ्टी ने मंदी मध्ये क्लोजिंग दिले असले तरी बँक निफ्टी मध्ये डेली टाइम फ्रेम मध्ये हॅमर पॅटर्न झाला आहे जो चांगला संकेत आहे.
2) कालच्याप्रमाणे आज देखील किरकोळ अपवाद वगळता संपूर्ण जागतिक मार्केट मध्ये मंदीचे वातावरण बघायला मिळते आहे.
3) RBI नेआज जाहीर केलेल्या मासिक अहवालात देशाच्या आर्थिक परिस्थिती बाबत समाधान व्यक्त केले आहे. उपलब्ध असलेली तरलता आणि कोरोनाचा सध्या कमी झालेला प्रभाव यामुळे बाजारात मागणी मध्ये वाढ होत असल्याचे देखील निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
4) आज देखील कालच्या प्रमाणेच संमिश्र वातावरण बघायला मिळाले. आयटी, हेल्थकेअर आणि FMCG ह्या इंडेक्स मध्ये तेजी तर सरकारी बँका, खाजगी बँका आणि मेटल इंडेक्स मध्ये मंदी बघायला मिळाली.
5) मार्केट मधील Volatility मध्ये थोडीशी वाढ झाली आणि त्यामुळे इंडिया विक्स ह्या इंडेक्स मध्ये देखील 0.42% वाढ झाली.
B)ट्रेडिंग साठी महत्वाच्या लेव्हल :-
1) निफ्टी साठी आता 16650 ते 16700 हा रेजिस्टन्स झोन असून 16500 ते 16550 हा सपोर्ट झोन आहे. सोमवारी सांगितल्या प्रमाणे निफ्टी ची वाटचाल 16700 ते 16800 च्या दिशेने चालू आहे.
2) बँक निफ्टी साठी 35500 ते 35600 हा सपोर्ट झोन असून 36000 ते 36250 हा रेजिस्टन्स झोन आहे.
3) आज बँक निफ्टी मध्ये दुपारच्या सत्रात आलेल्या रिकव्हरी मुळे उद्यासाठी आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
C) तेजी मधील काही शेअर:-
अपोलो हॉस्पिटल, पेट्रोनेट, माइंडट्री, टाटा consumer आणि जुबिलीयंट फूड
D)मंदी मधील काही शेअर:-
वेदांता, येस बँक, जिंदाल स्टील, Canara बँक आणि एनएमडीसी
good
Sir
Your analysis is perfect… Nifty showing same levels …