A)पार्श्वभूमी :-
1) मागील चार दिवसांच्या सलग तेजी नंतर बुधवारी निफ्टी मध्ये वीकली एक्सपायरी च्या निमित्ताने प्रॉफिट बूकिंग बघायला मिळाले. आपण सोमवारी दिलेल्या पहिल्या टार्गेट ला टच करून निफ्टी ने प्रॉफिट बूकिंग दाखवले असले तरी आपण दिलेल्या लेव्हल मध्येच निफ्टी ने ट्रेडिंग केले आहे. बँक निफ्टी ने सोमवारी मंगळवारी मंदी दाखवली होतीच. मात्र बुधवारी गॅप अप ओपनिंग नंतर ज्या पद्धतीने प्रॉफिट बूकिंग आले ते बघता ट्रेंड थोड्या कालावधी साठी बदलण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
2) संपूर्ण जागतिक मार्केट मध्ये ह्या आठवड्यात मंदीचे वातावरण बघायला मिळते आहे आणि तेच चित्र आता शुक्रवारी भारतात बघायला मिळेल असे दिसू लागले आहे.
3) आंतराष्ट्रीय पातळीवर आता हळू हळू प्रवासावरील निर्बंध कमी करण्यात येऊ लागले आहेत. याचा फायदा येत्या काळात विमान कंपन्यांना होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
4) बुधवारी देखील सेक्टोरियल इंडेक्स मध्ये संमिश्र वातावरण बघायला मिळाले. FMCG, Consumer durable ह्या इंडेक्स मध्ये थोडी तेजी तर खाजगी बँका, रियालटी आणि फिनान्शियल सर्विसेस मध्ये मंदी बघायला मिळाली.
5) मार्केट मधील Volatility मध्ये घट झाली आणि त्यामुळे इंडिया विक्स ह्या इंडेक्स मध्ये देखील 3.78% घट झाली.
B)ट्रेडिंग साठी महत्वाच्या लेव्हल :-
1) निफ्टी साठी आता 16600 ते 16650 हा रेजिस्टन्स झोन असून 16450 ते 16500 हा सपोर्ट झोन आहे. शुक्रवारी आणखी थोडी प्रॉफिट बूकिंग येऊ शकते.
2) बँक निफ्टी साठी 35200 ते 35300 हा सपोर्ट झोन असून 35800 ते 36000 हा रेजिस्टन्स झोन आहे.
3) शुक्रवारी संध्याकाळी अनेकदा प्रॉफिट बूकिंग येतच असते मात्र बुधवारी ज्या प्रकारे ट्रेडिंग झाले आहे ते बघता सकाळच्या सत्रात आणखी मंदी होऊन दुपारच्या सत्रात थोडा फार पुल बॅक येऊ शकतो.
C) तेजी मधील काही शेअर:-
मॅकडोवेल ,UBL, माइंडट्री, जुबिलीयंट फूड आणि डॉ. लाल पॅथ लॅब
D)मंदी मधील काही शेअर:-
इंडिया बुल हाऊसिंग, अपोलो हॉस्पिटल, वेदांता, हिंडाल्को आणि कोटक महिंद्रा बँक