दिनांक 23 ऑगस्ट, 2021 साठीचे मार्केट विश्लेषण:-

A)पार्श्वभूमी :-
1) अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळाली. मात्र खूप जास्त गॅप डाऊन झाल्याने नंतर पुल बॅक आला आणि दोन्ही इंडेक्स मध्ये दिवसभर साइड वेज ते मंदीचा ट्रेड बघायला मिळाला.
2) काही आशियाई बाजार वगळता इतर सर्व जागतिक मार्केटमध्ये शुक्रवारी पुल बॅक बघायला मिळाला आणि त्यामुळे बरीचशी मार्केट तेजी मध्ये बंद झाली आहेत. सिंगापूर मार्केट मध्ये ट्रेड होणारा SGX निफ्टी सुध्दा शुक्रवारी रात्री 16557 वर क्लोज झाला आहे. हा संकेत सोमवार साठी चांगला आहे.
3) सोमवारी Nuvoco Vistas ह्या कंपनीच्या आयपीओ चे लिस्टिंग होणार आहे. मात्र मार्केटचा मूड बघता आणि शुक्रवारी झालेल्या CarTrade ह्या आयपीओ चे निराशाजनक लिस्टिंग बघता Nuvoco कडून देखील फारशा अपेक्षा नाहीत. ग्रे मार्केट मध्ये देखील ह्या आयपीओ ला प्रिमियम मिळत नाहीये.
4) FMCG वगळता सर्व सेक्टर इंडेक्स नी शुक्रवारी मंदी दाखवली. मेटल, मीडिया, Realty, सरकारी बँका हे सेक्टर सर्वाधिक मंदी मध्ये होते.
5) खूप गॅप डाऊन ओपनिंग, त्यानंतर पुल बॅक परत मंदी अशा रोलर कोस्टर मुव्हमेंट मुळे मार्केट मध्ये Volatility वाढली. इंडिया विक्स हा इंडेक्स 8.60% नी वधारला. ह्याच आठवड्यात फ्युचर आणि ऑप्शन सेगमेन्ट ची मंथली एक्सपायरी असल्यामुळे Volatility वाढलेलीच राहील अशी अपेक्षा आहे.

B)ट्रेडिंग साठी महत्वाच्या लेव्हल :-
1) निफ्टी साठी आता 16400 ते 16500 हा नो ट्रेडिंग झोन आहे. 16400 चा खाली 16200 ते 16300 हा सपोर्ट झोन आहे. तर 16600 ते 16700 हा रेजिस्टन्स झोन आहे.
2) बँक निफ्टी साठी आता 34900 ते 35300 हा नो ट्रेडिंग झोन आहे. 34900 चा खाली 34400 ते 34500 हा सपोर्ट झोन आहे. तर 35500 ते 35600 हा रेजिस्टन्स झोन आहे.
3) शुक्रवार चे जागतिक चित्र बघता सोमवारी फ्लॅट ते गॅप अप ओपनिंग अपेक्षित आहे.

C) तेजी मधील काही शेअर:-
हिंदुस्तान युनिलीव्हर, ब्रिटानिया, माइंडट्री, एशियन पेंटस आणि नेस्ले

D)मंदी मधील काही शेअर:-
NMDC, वेदांता, टाटा स्टील, जिंदाल स्टील आणि JSW स्टील

Leave a Comment