दिनांक 24 ऑगस्ट, 2021 साठीचे मार्केट विश्लेषण:-

A)पार्श्वभूमी :-
1) अपेक्षेप्रमाणे आज निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली. मात्र खूप जास्त गॅप अप झाल्याने नंतर प्रॉफिट बूकिंग आले आणि दोन्ही इंडेक्स मध्ये दिवसभर साइड वेज ते मंदीचा ट्रेड बघायला मिळाला.
2)आज जवळपास सर्व जागतिक मार्केटमध्ये तेजी बघायला मिळाली. सिंगापूर मार्केट मध्ये ट्रेड होणारा SGX निफ्टी सुध्दा आज हे विश्लेषण लिहीत असताना 16550 वर ट्रेड करत आहे.
3) आज Nuvoco Vistas ह्या कंपनीच्या आयपीओ चे लिस्टिंग झाले आहे. अपेक्षेप्रमाणे लिस्टिंग 485 ला झाले मात्र त्या नंतर त्यामध्ये तेजी आली आणि 550 पर्यंत किंमत वाढली. उद्या Chemplast आणि Aptus ह्या दोन आयपीओ चे लिस्टिंग होणार आहे. ग्रे मार्केट मध्ये दोन्ही आयपीओ ला थोडा थोडा प्रिमियम मिळत असल्याने दोन्ही लिस्टिंग हिरव्या रंगात होण्याची शक्यता जास्त आहे.
4) आज किरकोळ अपवाद वगळता सर्व सेक्टर इंडेक्स मध्ये मंदी बघायला मिळाली. निफ्टी आयटी मध्ये चांगली तेजी बघायला मिळाली तर मीडिया, ऑटो आणि Reality ह्या इंडेक्स मध्ये सर्वाधिक मंदी झाली.
5) आज Volatility मध्ये थोडीशी घट झाली त्यामुळे इंडिया विक्स ह्या इंडेक्स 2.35% घट झाली.

B)ट्रेडिंग साठी महत्वाच्या लेव्हल :-
1) निफ्टी साठी आता 16450 ते 16550 हा नो ट्रेडिंग झोन आहे. 16400 ते 16450 हा सपोर्ट झोन आहे. तर 16600 ते 16650 हा रेजिस्टन्स झोन आहे.
2) बँक निफ्टी साठी आता 34900 ते 35250 हा नो ट्रेडिंग झोन आहे. 34900 चा खाली 34400 ते 34500 हा सपोर्ट झोन आहे. तर 35250 ते 35450 हा रेजिस्टन्स झोन आहे.
3) आज चे जागतिक चित्र बघता उद्या फ्लॅट ते गॅप अप ओपनिंग अपेक्षित आहे.

C) तेजी मधील काही शेअर:-
एस्कॉर्ट्स, माइंडट्री, HCL टेक आणि BEL

D)मंदी मधील काही शेअर:-
बायोकॉन, जुबिलियंट फूडस, भारत फोर्ज आणि बंधन बँक

Leave a Comment