शेअर मार्केट मराठी
शेअर मार्केट मराठी हा एक परिवार असून परिवारातील प्रत्येक सदस्याचे ध्येय हे शेअर मार्केट चे शास्त्र शुद्ध शिक्षण घेऊन, शेअर मार्केट बद्दल अधिक माहिती जाणून घेऊन, त्याचा योग्य तितका सराव करून मग पूर्ण तयारीनिशी ह्या व्यवसायात उडी घेऊन स्वतःची आर्थिक समृद्धी करणे आहे.
जास्तीत जास्त मराठी माणसांना शेअर मार्केटचे शास्त्रशुद्ध ज्ञान देणे, अनुभवांचे आदान प्रदान करणे, धोक्याची जाणीव करून देणे आणि शेअर मार्केटच्या ताकदीची ओळख करून देणे हाच माझा प्रयत्न आहे.
प्रा. प्रसाद साधले.
आमचे व्हिजन
शेअर मार्केटची योग्य समज असल्याशिवाय शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकत नाही. हीच समज देणारे सर्वोत्तम प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सातत्याने ह्या प्लॅटफॉर्म वर केला जात आहे आणि भविष्यात देखील केला जाईल.
आमचे मिशन
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यात मराठी माणसाचा टक्का खूपच कमी आहे. याला पिढ्यान पिढ्या चालत आलेले गैरसमज कारणीभूत आहेत. हे गैरसमज दूर करणे, योग्य प्रशिक्षण देणे, योग्य मानसिकता बनवणे, आर्थिक शिस्तीची सवय लावणे आणि जास्तीत जास्त सदस्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत करणे हाच ह्या प्लॅटफॉर्म चा कायम प्रयत्न राहील.