शेअर मार्केट शिक्षणातून समृद्धीकडे ..!

शिकूया, समजूया, सराव करूया, कमवूया आणि समृध्द होऊया… 

शिकून समजून आणि अनुभव न घेता केलेला कोणताही व्यवसाय म्हणजे जुगारच..! शेअर मार्केट मध्ये देखील बहुसंख्य लोक कोणताही मागचा पुढचा विचार न करता कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा केवळ काही व्हिडिओ आणि सोशल मीडिया वरील खोट्या जाहिरातींना बळी पडतात आणि कष्टाची कमाई शेअर मार्केट मध्ये गमावतात.
शेअर मार्केट मराठीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मराठी माणसाला शेअर मार्केटचे शास्त्रशुध्द ज्ञान देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच सोबत शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी लागणारे सायकॉलॉजीचे, विश्लेषणाचे आणि योग्य पद्धतीने सरावाचे मार्गदर्शन करण्याचा देखील प्रयत्न आहे. जास्तीत जास्त ह्या सेवांचा लाभ घ्या आणि शेअर मार्केट शिक्षणातून आपले जीवन समृद्ध करा. धन्यवाद

प्रा. प्रसाद साधले
संस्थापक आणि मुख्य ट्रेनर, शेअर मार्केट मराठी

शेअर मार्केट स्टार्टर कोर्स

शेअर मार्केट मध्ये नव्याने काम सुरू करणाऱ्या प्रत्येकाने शिकला पाहिजे असा शेअर मार्केट मधील आवश्यक सर्व संकल्पना समजून देणारा हा कोर्स आहे.