Upstox मधील  मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी (MTF)  म्हणजे काय?

प्रा. प्रसाद साधले

MTF म्हणजे काय?

MTF ही एक अशी सुविधा आहे की ज्यामुळे आपण केवळ 50% रक्कम देऊन शेअर खरेदी करू शकतो.  उरलेली रक्कम आपण Upstox कडून केवळ 20/- रुपये प्रती दिन इतका चार्ज आणि 20/- रुपये प्रती ऑर्डर इतके ब्रोकरेज देऊन मिळवू शकतो.

MTF वापरताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

MTF च्या माध्यमातून विकत घेतलेले शेअर जास्तीत जास्त 90 दिवस आपल्याकडे ठेवता येतात. MTF मधून विकत घेतलेले शेअर Upstox प्लॅटफॉर्म मध्ये Positions टॅब मध्ये दिसतील.

Burst

1

एकदा विकत घेतल्यानंतर हे शेअर कधीही विकता येतात.

Burst

2

आपल्याला हवे असतील तर 90 दिवसांमध्ये हे शेअर पूर्ण पैसे भरून कधीही आपल्या डिमॅट खात्यात जमा करता येतात.

Burst

3

MTF अंतर्गत आपल्याला जास्तीत जास्त 5 लाख रुपयांचे एक्सपोजर मिळू शकते.

Burst

4

आपल्याला प्रत्येक 50,000/- रुपयांच्या स्लॅब साठी प्रतिदिन 20/- रुपये चार्ज आकारला जाईल.

Burst

5

उदाहरणार्थ : जर आपण 80,000/- रुपये MTF म्हणून घेतले असतील तर त्यातील 50,000/- रुपयांसाठी 20/- रुपये प्रतिदिन आणि राहिलेल्या 30,000/- रुपयांसाठी 20/- रुपये प्रतिदिन असे एकूण 40/- रुपये प्रतिदिन चार्ज पडेल.

Burst

eg

MTF अंतर्गत प्रत्येक खरेदी आणि विक्री च्या व्यवहारासाठी CDSL कडून रुपये 20/- अधिक टॅक्सेस असा प्लेजिंग आणि अन प्लेजिंग चार्ज घेतला जातो.

Burst

6

प्रति ऑर्डर 2.5% किंवा 20/- रुपये ( जो कमी असेल तो ) असा ब्रोकरेज चार्ज Upstox कडून घेतला जातो.

Burst

7

तुम्ही एकदा MTF ऍक्टिवेट करून घेतल्यावर संपूर्ण नियम आणि अटी ची माहिती आपल्या रजिस्टर ईमेल आयडी वर Upstox कडून पाठवली जाते.

Burst

8

 MTF अंतर्गत केवळ NSE ह्या एक्स्चेंज मधील फ्युचर आणि ऑप्शन सेगमेन्ट मध्ये असणारेच शेअर खरेदी करता येतात.  अन्य शेअर किंवा BSE एक्स्चेंज मधील शेअर साठी ही सुविधा उपलब्ध नाही. 

Burst

9

 MTF अंतर्गत शेअर खरेदी केल्यानंतर त्याच दिवशी रात्री 9:30 वाजे पर्यंत CDSL च्या वेबसाइट वर जाऊन झालेला व्यवहार OTP एंटर करून ऑथोराइझ करावा लागतो. 

Burst

10 

MTF ऍक्टिवेट कसे करायचे? 

Upstox मध्ये MTF ऍक्टिवेट करणे ही एक पेपरलेस, जलद, सोपी आणि केवळ एकदा करण्याची प्रक्रिया आहे. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही ती प्रक्रिया कशी करायची ते पाहू शकता.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit.