गुंतवणुकीची नवीन संधी : Silver ETF

प्रा. प्रसाद साधले

मार्केट अपडेट  

Medium Brush Stroke

ETF म्हणजे काय?

ETF म्हणजे एक्स्चेंज ट्रेडेड फंड. हा म्यूचुअल फंड चा एक विशेष प्रकार आहे. शेअर प्रमाणेच ह्याची खरेदी विक्री थेट डिमॅट अकाऊंट मधून करता येते. शेअर प्रमाणेच मार्केट चालू असताना ETF ची किंमत सारखी बदलत असते.   

Medium Brush Stroke

Silver ETF ची ओळख

भारतातील पहिला Silver ETF सुरू करण्याचा मान ICICI Pru. Mutual Fund ला मिळाला आहे.  चांदी मध्ये कमीत कमी पैशात आणि जास्तीत जास्त सुरक्षितपणे गुंतवणूक करणे आता Silver ETF मुळे शक्य होणार आहे. 

Medium Brush Stroke

अधिक माहिती 

सोने व चांदी या मध्ये प्रत्यक्ष खरेदी करून गुंतवणूक करणे खर्चीक व जोखमीचे काम आहे. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी SGB, ETF, FOF सारखे आकर्षक पर्याय आधीच उपलब्ध होते. मात्र चांदी साठी असे पर्याय आत्ता पर्यंत नव्हते.  

Medium Brush Stroke

ICICI Pru Silver ETF

IPO प्रमाणेच म्यूचुअल फंड मध्ये NFO असतो. अर्थात IPO इतका NFO काही आकर्षक असत नाही. ह्या फंड चा NFO 5 ते 19 जानेवारी, 2022 ह्या कालावधीत उपलब्ध आहे. कमीत कमी 100 रु पासून आपण गुंतवणूक करू शकतो. 

Medium Brush Stroke

इतर Silver ETF

आता इतर म्यूचुअल फंड कंपन्या देखील Silver ETF चालू करत आहेत.  Nippon India आणि Aditya Birla Sun Life ह्या दोन्ही कंपन्या दिनांक 13 जानेवारी, 2022 पासून Silver ETF चालू करत आहेत.

Medium Brush Stroke

Gold की Silver ETF?

आता आपण पुढील काही स्लाइड वर Gold आणि Silver ETF मधील गुंतवणुकीची तुलना करणार आहोत. 

म्यूचुअल फंड कंपनी जो चार्ज घेते त्याला ER असे म्हणतात. कमी ER  असणे चांगले.  सोन्यापेक्षा चांदीचा साठवण्याचा खर्च जास्त असल्यामुळे Silver ETF चा ER Gold ETF पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

Burst

1

Expense Ratio (ER)

सोन्याचा वापर हा 80% दागिने बनवणे आणि गुंतवणुकीसाठी केला जातो मात्र चांदीचा वापर दागिने, भांडी ह्या सोबतच इंडस्ट्री मध्ये 50% पेक्षा जास्त केला जातो.  

Burst

2

वापर 

चांदीचा वापर इंडस्ट्री मध्ये जास्त असल्यामुळे इकॉनमी मधील बदलाचा जास्त प्रभाव चांदी वर होतो. त्यामुळे महागाईच्या विरोधात हेजिंग म्हणून चांदी मधील गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरू शकते.

Burst

3

किंमतीवर परिणाम 

सोन्याच्या किंमतीवर मागणी आणि पुरवठ्याचा परिणाम कमी होतो मात्र चांदीचा वापर इंडस्ट्री मध्ये होत असल्याने चांदीच्या किंमतीवर मागणी आणि पुरवठ्याचा जास्त परिणाम होतो. 

Burst

4

मागणी आणि पुरवठा