झी एंटरटेंमेंट (ZEEL) आणि सोनी (SPNI) यांच्या मर्जर नंतर गुंतवणूकदारांना संधी
प्रा. प्रसाद साधले
दिनांक 22 डिसेंबर, 2021 रोजी ZEE Entertainment Enterprises (ZEEL) च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नी कंपनीची Sony Pictures Networks India (SPNI) मध्ये मर्जर ची घोषणा केली.
1
ही मर्जर ची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान 8 ते 10 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.अशी माहिती ह्या नवीन आणि एकत्रित कंपनीचे MD आणि CEO श्री. पुनीत गोयंका यांनी दिली आहे.
2
मर्जर ची प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत ZEE5 व Sony Liv तसेच इतर सर्व प्लॅटफॉर्म स्वतंत्र चालतील. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनी ठरवेल की कोणता ब्रॅंड चालू ठेवायचा.
3
नवीन कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न : 1) SPNI कडे 50.86% 2) ZEE च्या प्रमोटर कडे 3.9%3) ZEE च्या शेअर होल्डर्स कडे 45.15%
4
गुंतवणूकदारांना संधी
मनोरंजन क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्या एकत्र येणार असल्यामुळे नवीन कंपनी भविष्यात अतिशय चांगली कामगिरी करू शकते.
विविध ब्रोकरेज हाऊसेस ची ZEEL मध्ये गुंतवणुकीसाठी टार्गेट :